जरबेराच्या फ़ुलाचा आकर्षकपणा व तसेच या फुलाचा ताजेपणा आणि टिकाऊपना या गुणधर्ममुळे हे शोभिवंत फुले लग्नकार्येत, इतर समारंभात आणि फुलांचे गुच्छ बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जरबेरा फुलाचे फ्लॉवर मार्केटमधील व्यावसायिक मूल्य जास्त आहे.
बाजाराच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील जरबेरा फुलशेतीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. जरबेरा लागवड करणेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज आसते. यामध्ये जराबेरा लागवाडीसाठी प्रमूख हरितगृह (polyhouse) तयार करणेसाठीचा खर्च जास्त येतो.
म्हणूनच, जरबेरा लागवडीपूर्वी जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्र समजावून घ्यावे लागेल.
आम्ही या लेखात आपल्याला सर्व तपशीलवार जरबेराचे अर्थशास्त्रा विषयी माहिती देण्याचा प्रायास केला आहे. यामध्ये आम्ही जरबेराची शेती करणेसाठी प्रारंभिक किती गुंतवणूक करणे आवश्यक असते, तसेच दररोजचा येणारा खर्च ( खेळते भांडवल) व जरबेरा फुल विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांची माहिती दिली आहे.
हि माहिती जमावान्याकरता आम्ही जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांची मदत घेतली आहे. आम्हाला आशा की आपल्याला हि माहिती जरबेराचे अर्थशास्त्रा समजण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
जरबेरा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक असते, यासाठी भारत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हायटेक शेतीसाठी सब्सिडी प्रदान करते. वेगवेगळ्या राज्यांच्या सब्सिडीची देण्याची टक्केवारी वेगवेगळी आहे.
जरबेरा लागवडीसाठी, 0.5 (2008 चौ.मी./मीटर) एकर क्षेत्रासाठीसाठी खर्च हरितगृह (polyhouse) उभारणीचा खर्च समाविष्ट करुन अपेक्षीत खर्च 22 ते 24 लाख आहे.
महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी 40%- 50% सबसिडी देते यामध्ये हरितगृह (polyhouse) उभारणीचा खर्च व जरबेरा रोपासाठी येणारा खर्च या दोन्ही घटकाचा विचार केला जातो.
जरबेरा लागवडीच्या प्रकल्पासाठी बँका कर्जाचा पुरवठा करतात तसेच सबसिडी घेणेकारती राष्ट्रीयकृत, सहकारी बँक या बँकाकडून कर्ज घेणे जरुरीचे आहे.
साधारणपणे जरबेरा शेतीतून खर्चाचा पूर्ण परतावा मिळणेसाठी 3- 4 वर्षाचा कालावधी लागतो.
जरबेरा पिकाचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आहे, अनुभवी जरबेरा शेतकरी त्यांच्या योग्य नियोजनामुळे सलग सात वर्षांपेक्षा अधिक काळ घेतात .
जर आपल्याला जरबेराच्या लागवडी विषयी अधिक जाणून घ्यायची असेल तर हा लेख वाचा हरितगृहातील जरबेरा फुलशेती
सब्सिडी संबंधित माहितीसाठी उपयुक्त वेबसाइट
जरबेरा शेतीचे अर्थशास्त्र
विशेष | तपशील | रक्कम |
---|---|---|
पॉलीहाउसचे क्षेत्र | 2008 चौरस / मीटर | |
पॉलीहाउस बाधकाम | एनएचबी नियमानुसार पॉलीहाउस कन्स्ट्रक्शन पॉलीहाउस, जीआय पाईपची संरचना आणि आयात प्लास्टिक @ रु. 750 / प्रति चौ. मीटर | 1,506,000 |
सिंचन प्रणाली | जरबेरासाठी ड्रिप सिंचन प्रणाली ,फर्टिगेगेशन युनिट | 188,000 |
बेड तयारी | बेड तयार करणे लाल माती, भाताचे तूस, एफवायएम, वाळू इ. | 220,000 |
जरबेराची रोपे | घनता: 6 रोपे / चौ. मीटर एकूण रोपे: 12,000 संख्या एका रोपांची किंमत: रु. 35 / रोप | 420,000 |
एकूण गुंतवणूक | 2,334,000 | |
खेळते भांडवल | ||
वीज | 3.0 युनिट/दिवस | 50,000 |
पाणी आवश्यकता | वर्षीक | 50,000 |
खते | पाण्यात विरघळणारे खते | 60,000 |
कामगार | 3- 4 मजूर दररोज | 250,000 |
पीक संरक्षण | फवारणी | 60,000 |
पॅकिंग साहित्य, वाहतूक, विक्री कमिशन | पॅकिंग साहित्य, वाहतूक, विक्री कमिशन | 162,000 |
Miscellaneous | देखभाल, घसारा | 226,800 |
एकूण | 858,800 | |
प्रति वर्ष उत्पन्न | ||
उत्पन्न /रोप/ वर्ष | 45 | 540,000 |
प्रत्येक फुलाची किंमत रु | 2.75 ₹ | 2.75 ₹ |
प्रति वर्ष एकूण परतावा | प्रति वर्ष | 1,485,000 |
खेळते भांडवल | प्रति वर्ष | 858,800 |
प्रति वर्ष निव्वळ परतावा | प्रति वर्ष | 626,200 |
(वरील गणना केवळ निदर्शक आहेत.)
यावरून आम्ही आपणास सांगू शकतो की जरबेरा शेती हि शेतकऱ्यासाठी फायद्याची शेती आहे. या शेतीमधून शेतकरी सुमारे 0.5 एकर जरबेरा फुलशेतीपासून दर वर्षी सुमारे सहा लाख रुपये कमवू शकतो.
जर आपाल्याला जरबेरा जरबेरा फुल शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला comment box मध्ये विचारा.
माझा प्लॉट 20गुंठे चा आहे त्यात जरबेरा आहे पण निमोटेड मूळ मी मोडलाय तरी मला नवीन लागवड करायची आहे निर्जंतुक करण्यासाठी काय काय करावे लागेल
नमस्कार अभिजीत,
माती निर्जंतुकीकरणासाठी Hydrogen peroxide (H2O2) with silver चा वापर करा, तसेच बेड तयार करताना निबोळी पेड, निमोटेड प्रतिबंधक केमिकल वापरा
जरबेरा खत व्यवस्थापन माहिती द्या
Hello sir,
please contact 8788462787
I AM INTRESTED IN POLYHOUSE PLEASE I WANT MORE INFERMETION ABOUT THIS 8446290027
Hello sir,
please contact at 878462787 our team will provide step by step guidance on how to start greenhouse farming to its marketing
नमस्कार सर, आपण खुप छान , सुटसुटीत व सर्वांना सहज समजेल अशी माहीती दिलीत. पण या सर्व शेतिसाठी आनुदान मिळविण्यासाठी अर्ज कोठे, व कसा करायचा व आनुदान कसे मिळवायचे या संबंधी माहिती मिळावी, हि विनंती.
sure