हरितगृहातील जरबेरा फुलशेती

जरबेरा हे हरितगृहातील एक महत्त्वाचे व्यावसायिक पिक आहे, जरबेराचे फुल हे फारच आकर्षण असते या फुलांमध्ये पिवळा, नारंगी, पांढरा, गुलाबी, लाल आणि इतर अनेक रंगाच्या जाती उपलब्ध आहेत. जरबेरा फुलाचे दांडे लांबसडक आणि हिरव्या रंगाचे असतात.  जरबेराची बाजारपेठत चांगली मागणी यामुळे जरबेरा फुलशेती ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे साधन बनली आहे.

Table of Contents

हरितगृहामध्ये ( Greenhouse) जरबेराची लागवड मातीमध्ये किंवा मातीविना (कोकोपीट) केली जाते. या दोन्ही पद्धतीचे काही फायदे व काही तोटे पण आहेत.

  • मातीविना पद्धतीत जरबेरा लागवड खर्च 20-30%  अधिक आहे.
  • मातीविना पद्धतीत उत्पादन जास्त येते.
  • पिकाची काटेकोर देखरेख करणे आवश्यक असते (मातीविना पद्धतीत)
  • 2 एकर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी  मातीविना पद्धत व्यावसायिक दृष्टीने योग्य आहे.
  • भारतामध्ये वीज आणि सिंचनयुक्त पाण्याच्या समस्यमुळे जरबेराची लागवड मुख्यत्वे मातीत करतात.

भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश प्रमुख जरबेरा फुलाचे उत्पादक राज्य आहेत.

gerbera cultivation process

1) जरबेरा लागवडीसाठी आवश्यक माती संरचना

जरबेरा लागवडीसाठी मातीमध्ये हे घटक आवश्यक आहेत

  •  मातीचा पीएच 5.5 ते 6.5 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  •  क्षारता स्तर 1 एमएस / सें.मी. पेक्षा जास्त नसावी.
  •  माती फार सच्छिद्र आणि तसेच पाण्याचा निचरा होणारी असावी त्यामुळे  रोपांची मुळाची चांगली वाढ होते.

रेड लेर्डिटिक माती हि जरबेरा लागवडीसाठी आदर्श माती मानली जाते.

म्हणून जेव्हा तुम्ही जरबेराची फुलशेतीची करण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा लवकरात लवकर मातीची तपासणी करून घ्या.

माती निर्जंतुकीकरण

जरबेरा लागवड करण्यापूर्वी मातीची निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे मातीमधिल रोग, जीवाणू, कीड, बुरशी, कीडची अंडी यांचा नायनाट करता येतो.

फंगस फॉइटथथोरा हि बुरशी जरबेरा पिकसाठी अतिशय धोकादायक आहे.

माती निर्जंतुकीकरण करण्याच्या तीन मुख्य पद्धती उपलब्ध आहेत –

  1. स्टीम पद्धत:   ही  पद्धत भारतीय परिस्थितीसाठी व्यावहारिक नाही.
  2. सूर्य किरण पद्धत : या पद्धतीत प्लास्टिकची शीट जमिनीवर 6-8 आठवडे झाकली जाते. सुर्य किरण मुळे  माती गरम होते  आणि  बुरशीचे नष्ट होते.
  3. केमिकल पद्धत: ही सर्वात प्रगत आणि उपयुक्त पद्धत आहे. या  पद्धतीत  Hydrogen peroxide (H2O2) with silver  हे द्रावण जमिनीचा निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरला जातो.

केमिकल पद्धत -Hydrogen peroxide (H2O2) with silver

प्रक्रिया:

  1. लागवडीपूर्वी पाण्याने बेड ओले करावेत.
  2. त्यानंतर Hydrogen peroxide (H2O2) with silver  35 मिली प्रति लीटर पाण्यात मिसळा.
  3. हे  द्रावण माती बेडवर समान रीतीने  एक मीटर क्षेत्रासाठी एक लिटर वापरा. त्यानंतर आपण 4 ते 6 तासांत पीक लागवड करु शकतो.

Hydrogen peroxide (H2O2) with silver फायदे

  1. आर्थिकदृष्ट्या सुलभ.
  2. वापरायला खूप सोपे आणि सुरक्षित.
  3. निर्जंतुकीकरण केल्यानंतर पिकाची लागवड 4 ते 6 तासानी करू शकतो.
  4. पर्यावरणाला अनुकूल आणि रोपावर  कोणत्याही  नुकसानकारक प्रभाव  करत नाहीत.
  5. जवळजवळ  सर्व बुरशी, जीवाणू आणि मातीमधील उपस्थितीत कीटकांच्या अंडी नष्ट करते.

 

2) जरबेरा लागवडीसाठी बेड तयार करणेची  पद्धत

जरबेराचे बेड

जरबेरा वनस्पतीला पाण्याचा चांगला-निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्यकता असते, त्यामुळे जरबेराची लागवड उंच बेड वर करतात;
बेडचे आकारमान याप्रमाणे असावे.

  • बेडची उंची: 1.5 फूट (45 सें.मी.)
  • बेडची रूंदी: 2 फूट (60 सेंटीमीटर)
  • दोन बेड मधिल अंतर: 1 फूट (30 सें.मी.)

जर शेतात काळी माती असेल तर प्रथम  मुरुमाचा  (6 “थर)  द्यावा, त्यानंतर बाहेरून लागवडी योग्य लाल माती आणावी.  व त्यानंतर चागले कुजलेले शेणखत  सोबत मिसळावे.

शेणखत मातीची पोषण शमता वाढवित आहे आणि पिकाला हळूहळू पोषण देतो.

नेमेटोड रोग प्रतिबंधासाठी नीम केक चा वापर करावा हे सर्व साहित्य मातीमध्ये चांगले मिसळून घेणे आवश्यक आहे.

बेड तयार करताना लागणारे साहित्य –

जरबेरा बेड तयार करताना  लागणारे साहित्य

जरबेरासाठी मातीचे बेड तयार झाल्यावर त्या बेड वर खताचा बेसल डोस द्यावा. हा डोस रोपे लावण्याआधी बेड वरील 6 ” मातीमध्ये चांगला मिसळावा.

रासायनिक खते   क्षेत्र प्रमाण
सिंगल सुपर फॉस्फेट20m25000gm
बायोझॅम ग्रॅन्यूलस20m2400gm
Humiguard ग्रॅन्यूलस20m2400gm
 मॅग्नेशियम सल्फेट20m21000gm

 

3) जरबेरा रोपांची निवड व लागण

जरबेरा रोपाच्या विविध जाती उपलब्ध आहेत. जरबेराची योग्य जात  निवडणे हे फार महत्त्वाचे आहे. यावरच जरबेराचे उत्पादन अवलंबून असते.

तसेच मार्केटिंग दृष्टीकोनातून आपल्या उत्पादनाच्या बॉक्समध्ये चांगला रंग संयोजन असणे आवश्यक असते. आम्ही आमच्या ग्रीनहाउसमध्ये हा रंगसंगीत रोप वापरतो.

लाल 20%
पिवळा20%
गुलाबी20%
ऑरेंज20%
पांढरा20%

भारतामध्ये 5 ते 10 जरबेरा रोपे तयार करणाऱ्या नर्सरी उपलब्ध आहे, तज्ज्ञ जरबेरा फुलशेती उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या नर्सरीमधून ठराविक जातीचीच रोपांची निवड करतो, तो एकाचा नर्सरीमधून साऱ्याच रंगाच्या जाती निवडत नाही.

जरबेराच्या काही प्रसिद्ध जाती –

Dune ,Pre Intenzz, Intense, Winter Queen, Inferno, Cacharelle, Jaffa, Dana Ellen, Sangria, Diana, Imperial,  Thalsa, Sonsara, Balance, Paganini, Anneke, Nette, Rosaline, Rosetta, Gloria.

जरबेरा रोपे पुरवणाऱ्या नर्सरीची  यादी-

ह्या भारतातील आघाडीचे, विश्वसनीय जरबेरा रोपे तयार करणाऱ्या कंपन्या ( नर्सरी ) आहेत.

रोपे लागण –

जरबेराची रोपे लावताना, रोपाचा crown मातीच्या 1 ते 2 सेंटीमीटरपेक्षा मातीच्या वर राहील असा लावला  पाहिजे.

जरबेरा रोपमधील अंतर

एका बेडवर दोन ओळीत रोपांची लागवड केली जाते, दोन ओळीमधील अंतर 37.5 सें.मी. आणि  दोन रोपमधील अंतर 30 सेंटीमीटर ठेवले जाते, म्हणजे,

  • ओळी -ओळी  = 37.5 सेमी = 1.25 फूट
  • रोप – रोप = 30.0 सेमी = 1 ‘फूट

4) खते व्यवस्थापन

रोपे लागणी नंतर तीन आठवड्यांनी खते  (फर्टिगेशन ) देणे  सुरू  केले जाते.  पहिले तीन महिने जरबेरा पिकाला देते स्टार्टर ग्रेड खते दिली जातात.  प्रत्येक दिवसाआड खताचा डोस दिला जातो.

45-50 दिवसानंतर जरबेराच्या रोपाला कळी लागणे सुरु होते. सुरवातीच्या काळात रोपांची वाढ होण्याकरिता करिता कळ्या खुडून ( disbudding ) टाकाव्यात.  जरबेराच्या रोपाला 16 ते 18 पूर्णपणे विकसित पाने येतील तेव्हापासून आपण जरबेरा फुलांचे उत्पादन घेऊ शकतो.

जेव्हा आपण जरबेरा फुलाचे उत्पादन घेणे सुरु करतो त्याकाळात उत्पादक फेज( productive phase) खते द्यावीत ती N: P: K – 2: 1: 4 (e.g., N: P: K – 15: 8: 35) प्रती रोप 0.4 gm या प्रमाणात द्यावी. हि खते दिवसाआड द्यावीत.

त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकच्या गरजेनुसार द्यावीत (e.g., Combi II, Microscope B, Rexolin, Sequel and Mahabrexil @ 40 grams per 1000 liters of water).

प्रत्येक 2 ते 3 महिन्यानंतर मातीची तपासणी करावी व त्यानुसार पिकासाठी लागणारे खताचे नियोजन करा.

5) जरबेरा फुले काढणी:

जरबेरा फुले काढणी

पेरणीनंतर 12-14 आठवड्यांनी (85-90 दिवस) पहिली फुले काढणीस सुरुवात  करतात. जेव्हा जरबेरा फुलाची 2 -3 पटल पूर्णपणे विकसित होतात तेव्हा ते फुल काढण्यायोग्य आहे हे समजले जाते.

चांगल्या जरबेरा फुलांच्या  देठची लांबी 45-55 cm, आणि फुलाचा व्यास 10 – 12 cm असते.

सकाळी किंवा संध्याकाळी वेळी जरबेरा फुलांची काढणी केली जाते.

जरबेरा फुलांची काढणीसाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. काढलेली फुले  स्वच्छ पाणी असलेल्या बादलीमध्ये ठेवावीत.

त्यानंतर छिद्र असलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये ती पॅक करावीत. 10 फुलाचा एक गठ्ठा याप्रमाणे गठ्ठे बनवावेत व  ते  गठ्ठे कोरोगेट बॉक्समध्ये  300- 500 फुले ( 30- 50 गठ्ठे) भरावीत व विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत.

जरबेराचे एक रोप दर वर्षी सुमारे 45 फुले देते.

पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्रविषयी वाचा

6) दैनिक  कामे

जरबेराचे पिका हे बहुवार्षिक पिक आहे. या पिकापासून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी जरबेरा पिकाची योग्य ती काळजी घेणे जरुरेचे आहे.

 हरितगृहामध्ये कीटक आणि रोग नियंत्रण

प्रत्येक 2-3 दिवसानी कीटक आणि रोग नियंत्रणासाठी विविध कीटकनाशके आणि बुरशीनाशक व टॉनीकचा वापर करावा.

तसेच दररोज पिकाची काळजीपूर्वक पाहणी करावी याद्वारे येणाऱ्या रोगावर लवकर नियंत्रण करता येते.

खुरपणी आणि माती सैलसर करणे

बेड वर येणारे तण हे जरबेरा पिकासोबत स्पर्धा करते, याचा परिणाम उत्पादना वर होतो म्हणून लवकरात लवकर येणारे तण काढून टाकणे आवश्यक आहे.

दैनंदिन सिंचनमुळे, बेडचा पृष्ठभाग कठिण होते त्यामुळे रोपाच्या मुळांना  खत व हवा मिळणे अवघड जाते म्हणून बेड वरील माती खरवडून  सैल करणे आवश्यक असते .  माती खुरपणी एका महिन्यातून  एकदा किवा  दोनदा करावी.

जुन्या पानांची काढणी:

जरबेराची जुनी, वाळलेली पाने काढून टाकावीत त्यामुळे हवा खेळती राहन्यास मदत होते तसेच कीटक आणि रोग नियंत्रण करणे सोपे जाते व जरबेराच्या रोपाला लवकर नविन पाने येतात.

7) रोग व कीड माहिती

1) रोग

पावडर मिल्ड्यू ( Powdery mildew) –

Powdery mildew on gerbera

या रोगामध्ये  जरबेरा रोपाच्या पानावर पांढरा पावडर(बुरशी)  थर येतो हा थर वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस प्रभावित करतो . पावडर मिल्ड्यू  मुख्यतः हिवाळ्यातील मोसमात दिसून येतो.

रूट रॉट ( Root rot ) – 

या रोगामध्ये प्रथम रोपांची नवीन पाने कोमाजतात व त्यानंतर रोपांची मर होते हा रोग पायथनियम (Pythium) मुळे  होतो.

फंगल कॉम्प्लेक्स  ( Fungal Complex) –

या रोगामध्ये रोपांची वाढ खुटते , व  कमी दर्जाची फुले प्राप्त होतात.

Alternaria leaf spots –

जर बर्याच काळापासून पानांची पृष्ठभागावर ओलावा राहिला तर पानांवर ब्लॅक स्पॉट दिसतात.

बॉटरीटिस (Botrytis) – 

जेव्हा हवेच्या सापेक्ष आर्द्रता 92% पेक्षा जास्त असते तेव्हा बोटरीटिस हा रोग उद्भवते . बोट्रीटिसमध्ये फुलावर ग्रे स्पॉट दिसतात.

2) कीड:

पांढरी माशी ( Whitefly) 

Whitefly

पांढरी माशी व्हाईटफ्लाय ही हरितगृहातील ( polyhouse)  एक गंभीर कीटक आहे,  सुरुवातीच्या काळात whitefly नियंत्रित करणे  आवश्यक आहे, त्यानंतर ते नियंत्रित करणे कठीण जाते.

गरम आणि शुष्क वातावरण हे व्हाईटफ्लाय ( Whitefly)  वाढीसाठी उपयुक्त आहे.

ग्रीन हाऊस / पॉलीहाऊस मध्ये पांढऱ्या माशी  नियात्राणासाठी पिवळे चिकट सापळे वापरा.

लीफ मायनर (Leaf Miner)

Leaf Miner on gerbera

लीफ मायनर हे रोपाच्या कोवळ्या भागातून व पानातून  रस शोषून घेतात तसेच पानात लीफ मायनर अळ्या अनेक भुयारे निमार्ण करतात.

लाल कोळी (Red Mites )

लाल कोळी पानेच्या खालच्या बाजूवरील रस शोषून घेतो, त्यामुळे पानांच्या खालच्या पृष्ठभागावर तपकिरी चट्टे विकसित  होतात परिणामी पानांमध्ये कोरडेपणा दिसून येतो. व फूलाचा दर्जा कमी येतो.

सायक्लेमन माइट्स (Cyclamen mites)

यामुळे जुन्या पाने गुडालली जातात व रोपांना येणारी नवीन पाने  विकृत आकारात येतात त्यामुळे . फुलांच्या पाकळ्यांची गुणवत्ता आणि आकार कमी होतो.

Caterpillar:

हा हरितगृहातील फार उपद्रवी कीटक आहे  नवीन येणाऱ्या कळीचे तो मोठ्या प्रमाणात नुकसान करतो तसेच पानाचेपण नुकसान करतो.

फुलकिडे (Thrips)

फुलकिडे  हे पानाना व कळ्यांना खरवडतात  आणि तसे खरवडल्यानंतर त्यातुन जो रस येतो तो रस हे फुलकिडे  खातात. असे खरवडल्यामुळे व फुलाच्या पाकाल्यावर  डाग पडतात.

नेमेटोड्स:

निमेटोडमुळे रोपांची वाढ  खुटते व पाने पिवळे पडतात. पावसाळ्यातील गढूळ  पाणी, नेमाटोडच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी अनुकूल परिस्थिती निमार्ण करते.

8)  जरबेरा फुलांचे मार्केटिंग

जरबेरा फुलांची मागणी लग्नाच्या हंगामात जास्त असते ,मुख्यतः जानेवारी, फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जरबेराला फारच मागणी असते त्यानुसार जरबेरा उत्पादन शेतकर्याने नियोजन करावे.

फुलांचा प्रमुख बाजार आहे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, कोलकता,अहमदाबाद ,पुणे, बंगलोर  या मोठ्या शहरात चालतो.

list of top flower market in india

 

 

3 thoughts on “हरितगृहातील जरबेरा फुलशेती”

  1. अमर सावंत सर नमस्कार मि अभिजीत पाटिल रा नायगांव ता कलम्ब जी उस्मानाबाद मि जरबेरा ची शेती करतोय मला चांगल्या ट्रेनर ची गरज आहे मला आपला नंबर सेंड करा। 9673535511,9130500093

    उत्तर
  2. खूप छान माहिती सांगितली सर आपण,. अशी सविस्तर माहिती दुसरीकडे कोठेही मिळणार नाही. खूप खूप आभार.

    उत्तर

Leave a Comment

Pin It on Pinterest