पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्र

जरबेराच्या फ़ुलाचा आकर्षकपणा व तसेच या फुलाचा ताजेपणा आणि टिकाऊपना या  गुणधर्ममुळे हे शोभिवंत फुले लग्नकार्येत, इतर समारंभात आणि फुलांचे गुच्छ बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जरबेरा फुलाचे  फ्लॉवर मार्केटमधील व्यावसायिक मूल्य जास्त आहे.

बाजाराच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील जरबेरा फुलशेतीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. जरबेरा लागवड करणेसाठी  मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज आसते. यामध्ये जराबेरा लागवाडीसाठी प्रमूख हरितगृह (polyhouse) तयार करणेसाठीचा खर्च जास्त येतो.

म्हणूनच, जरबेरा लागवडीपूर्वी जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्र समजावून घ्यावे लागेल.

आम्ही या लेखात आपल्याला सर्व तपशीलवार जरबेराचे अर्थशास्त्रा विषयी माहिती देण्याचा प्रायास केला आहे. यामध्ये आम्ही जरबेराची शेती करणेसाठी प्रारंभिक किती गुंतवणूक करणे आवश्यक असते, तसेच दररोजचा येणारा खर्च ( खेळते भांडवल)  व जरबेरा फुल विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांची माहिती दिली आहे.

हि माहिती जमावान्याकरता आम्ही जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांची मदत घेतली आहे. आम्हाला आशा की आपल्याला हि माहिती जरबेराचे  अर्थशास्त्रा समजण्यासाठी नक्कीच  उपयोगी पडेल.

जरबेरा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक असते, यासाठी भारत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हायटेक शेतीसाठी सब्सिडी प्रदान करते. वेगवेगळ्या राज्यांच्या सब्सिडीची देण्याची टक्केवारी वेगवेगळी आहे.

जरबेरा लागवडीसाठी, 0.5 (2008 चौ.मी./मीटर) एकर क्षेत्रासाठीसाठी खर्च हरितगृह (polyhouse) उभारणीचा खर्च समाविष्ट करुन अपेक्षीत खर्च 22 ते 24  लाख आहे.

महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी  40%- 50% सबसिडी देते यामध्ये हरितगृह (polyhouse) उभारणीचा खर्च व जरबेरा रोपासाठी येणारा खर्च  या दोन्ही घटकाचा विचार केला जातो.

जरबेरा लागवडीच्या प्रकल्पासाठी बँका कर्जाचा पुरवठा करतात तसेच सबसिडी घेणेकारती राष्ट्रीयकृत, सहकारी बँक या  बँकाकडून कर्ज घेणे जरुरीचे आहे.

जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्र

साधारणपणे जरबेरा शेतीतून खर्चाचा पूर्ण परतावा मिळणेसाठी 3- 4 वर्षाचा कालावधी लागतो.

जरबेरा पिकाचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आहे, अनुभवी जरबेरा शेतकरी त्यांच्या योग्य नियोजनामुळे सलग सात वर्षांपेक्षा अधिक काळ  घेतात .

जर आपल्याला जरबेराच्या लागवडी विषयी अधिक जाणून घ्यायची असेल तर  हा लेख वाचा हरितगृहातील जरबेरा फुलशेती

सब्सिडी संबंधित माहितीसाठी उपयुक्त वेबसाइट

जरबेरा शेतीचे अर्थशास्त्र

विशेषतपशीलरक्कम
पॉलीहाउसचे क्षेत्र2008 चौरस / मीटर
पॉलीहाउस बाधकामएनएचबी नियमानुसार पॉलीहाउस कन्स्ट्रक्शन पॉलीहाउस,
जीआय पाईपची संरचना आणि आयात
प्लास्टिक @ रु. 750 / प्रति चौ. मीटर
1,506,000
सिंचन प्रणालीजरबेरासाठी ड्रिप सिंचन प्रणाली ,फर्टिगेगेशन
युनिट
188,000
बेड तयारीबेड तयार करणे
लाल माती, भाताचे तूस,
एफवायएम, वाळू इ.
220,000
जरबेराची रोपेघनता: 6 रोपे / चौ. मीटर
एकूण रोपे: 12,000 संख्या
एका रोपांची किंमत: रु. 35 / रोप
420,000
एकूण गुंतवणूक2,334,000
खेळते भांडवल
वीज3.0 युनिट/दिवस50,000
पाणी आवश्यकता  वर्षीक50,000
खतेपाण्यात विरघळणारे खते60,000
कामगार3- 4 मजूर दररोज250,000
पीक संरक्षणफवारणी60,000
पॅकिंग साहित्य,
वाहतूक, विक्री
कमिशन
पॅकिंग साहित्य,
वाहतूक, विक्री
कमिशन
162,000
Miscellaneousदेखभाल, घसारा226,800
एकूण858,800
प्रति वर्ष उत्पन्न
उत्पन्न /रोप/ वर्ष45540,000
प्रत्येक फुलाची किंमत रु2.75 ₹2.75 ₹
प्रति वर्ष एकूण परतावाप्रति वर्ष1,485,000
खेळते भांडवलप्रति वर्ष858,800
प्रति वर्ष निव्वळ परतावा प्रति वर्ष626,200

(वरील गणना केवळ निदर्शक आहेत.)

 

यावरून आम्ही आपणास सांगू शकतो की जरबेरा शेती हि शेतकऱ्यासाठी फायद्याची शेती आहे. या शेतीमधून शेतकरी सुमारे 0.5 एकर जरबेरा फुलशेतीपासून  दर वर्षी सुमारे सहा लाख रुपये कमवू शकतो.

जर आपाल्याला जरबेरा जरबेरा फुल शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला comment box मध्ये विचारा.

 

8 thoughts on “पॉलिहाऊसमधील जरबेरा फुलशेतीचे अर्थशास्त्र”

  1. माझा प्लॉट 20गुंठे चा आहे त्यात जरबेरा आहे पण निमोटेड मूळ मी मोडलाय तरी मला नवीन लागवड करायची आहे निर्जंतुक करण्यासाठी काय काय करावे लागेल

    उत्तर
  2. नमस्कार सर, आपण खुप छान , सुटसुटीत व सर्वांना सहज समजेल अशी माहीती दिलीत. पण या सर्व शेतिसाठी आनुदान मिळविण्यासाठी अर्ज कोठे, व कसा करायचा व आनुदान कसे मिळवायचे या संबंधी माहिती मिळावी, हि विनंती.

    उत्तर

Leave a Comment

Pin It on Pinterest