हरितगृहातील रंगीत ढोबळी मिरची लागवड 2024( colour capsicum farming)

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) हे हरितगृहातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक भाजीपाला पीक आहे. त्याला शिमला मिरची तसेच ढोबळी मिरची देखील म्हणतात. जगभरात  विविध भागात रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) शेती केली जाते.

Table of Contents

रंगीत ढोबळी मिरची हे पीक थंड हंगामातील पीक आहे, परंतु पॉलीहाऊसचा वापर करून रंगीत ढोबळी मिरचीची लागवड वर्षभर केली जाते. पॉलीहाऊस मध्ये तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित होत असल्याने भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे मिळतात.

१०० ग्रॅम ताज्या रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) फळामध्ये जीवनसत्त्व अ, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम (१.४ मिलीग्राम), मॅग्नेशियम (१.९ मिलीग्राम), फॉस्फरस (२.३ मिलीग्राम), आणि पोटॅशियम (२.३ मिलीग्राम) चे प्रमाण असते.

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) लागवडीसाठी मातीची निवड करणे

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) लागवडीसाठी माती निवडताना खालील बाबींचा विचार केला पाहिजे:

  • मातीचा पी.एच ६.० ते ६.५ दरम्यान असावा.
  • मातीचा इ. सी १ एम.एस/सेमीपेक्षा जास्त नसावा. यासाठी आपण साइट निवडताच प्रथम मातीची तपासणी करून घ्यावी.
  • माती अत्यंत सच्छिद्र असावी आणि चांगली निचरा होणारी हवी, जेणेकरून मुळाची वाढ चांगली होईल.

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) लागवडीसाठी बेड कसा असावा

IMG 20141213 131530898 HDR

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) लागवडीसाठी उंच बेडचा (गादी वाफा) वापर केला जातो. यामुळे रंगीत ढोबळी मिरची रोपाच्या मूळांना वाढीसाठी योग्य जागा मिळते व हवा खेळती राहण्यास मदत होते.

  • उंची: १ फूट (३० सेंटीमीटर)
  • रुंदी: ३ फूट (९० सेंटीमीटर)
  • दोन बेड दरम्यान अंतर : २ फूट (६० सेंटीमीटर)

रंगीत ढोबळी मिरची रोपांची लागवड

4. Plantation 1

रंगीत ढोबळी मिरची ची रोपे एकाच बेडवर दोन ओळी पद्धतीने लावली जातात. त्यामधील अंतर खालीलप्रमाणे,

  • रोप-रोप – ४५ ते ५० सें.मी.
  • ओळ-ओळ – ५० सें.मी.

लागवडी नंतर आर्द्रता ८०% पर्यंत २-३ आठवडे राखली जाते.

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) पिकामधील मशागतीच्या पद्धती

 हरितगृहात लागवड केलेले रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) हे पीक १०-१२ महिन्याचे असून, या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो.

झाडाला आधार देणे

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) पिकाची उंची १० ते १२ फुटापर्यंत वाढते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही, त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते. एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन, अशा १२ गेज जाडीच्या तारा वाफ्याच्या समांतरपणे बांधून घेतल्या जातात.

त्यानंतर रंगीत ढोबळी मिरची लागवड बेडवर केली जाते. लागवड झाल्यानंतर काही दिवसातच एका झाडासाठी चार अशा संख्येत प्लास्टिक दोऱ्या बांधल्या जातात. दोरीचे एक टोक तारेला बांधून, दुसरे टोक खाली सोडले जाते. त्यानंतर त्या झाडाच्या खोडाला बांधल्या जातात.

रोपांचा शेंडा खुडणे

गादीवाफ्यावर रोपांची लागवड झाल्यानंतर १८-२२ दिवसांनी रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) रोपांचा शेंडा धारदार कात्रीने खुडला जातो, त्यामुळे मिरची रोपाला दोन किंवा चार फुटवे येतात. या फुटव्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घेतल्या जातात.

छाटणी/पिंचिंग

5. Intercultural operation

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) फुले येण्यास सुरुवात झाल्यावर त्याची छाटणी केली जाते, यामुळे रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) रोपाला योग्य आकार येण्यास, तसेच फळाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये दोन किंवा चार मुख्य खोड ठेवून, कडेचे फुटवे व फांद्या, पहिल्या किंवा दुसऱ्या पेराजवळ खुडून टाकल्या जातात.

रोपांना वळण देणे

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) लागवडीत पुढील वळण देण्याच्या पद्धती वापरतात.

दोन फांदी पद्धत (टू स्टेम ट्रेनिंग)

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) रोपांचा शेंडा खुडल्यानंतर सुरुवातीपासून दोन प्रमुख फुटवे, मुख्य फांदीवर वाढवले जातात.

 चार फांदी पद्धत (फोर स्टेम ट्रेनिंग)

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) रोपाला पाच ते सहा पानांच्या जोड्या येतात, तेव्हा त्याची खुडणी केली जाते. त्याच्या खालील पानांच्या बेचक्यातून आलेले चार निरोगी व जोमदार फुटव्यांना वाढू दिले जाते.

फळांची विरळणी

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) मध्ये उच्च गुणवत्तेची फळे येण्यासाठी फळांची विरळणी करणे आवश्यक आहे. यामुळे एकाच वेळेस भरपूर फळे येण्याचा धोका टळतो.

काढणी

8. Grading

रंगीत ढोबळी मिरची फळांची काढणी प्रामुख्याने लागवडीनंतर ६५ ते ९० दिवसांनी सुरु होते. रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) फळांची काढणी त्यांच्या जाती आणि रंगानुसार, तसेच बाजारपेठेनुसार, वेगवेगळ्या वेळी केली जाते.

रंगीत ढोबळी मिरची फळांची काढणी ही तीन अवस्थांमध्ये केली जाते.

  • हिरवी अवस्था – फळांचा रंग हिरवा असतो.
  •  ब्रेकर अवस्था- फळांचा दहा टक्के पृष्ठभाग रंगीत झालेला असतो.
  • पूर्ण रंग अवस्था – ९० टक्क्यांपेक्षा जास्त पृष्ठभाग रंगीत झालेला असतो.

काढणी करताना, दूरच्या बाजारपेठेत पाठवताना, रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) फळांना दहा टक्के रंग आल्यानंतर काढणी केली जाते. जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.

फळांची काढणी सकाळी अथवा सायंकाळी केली जाते. यासाठी तीक्ष्ण धार असलेल्या चाकूचा वापर करून फळे झाडावरून देठासहीत काढली जातात.

प्रतवारी

रंगीत ढोबळी मिरची फळांची काढणी झाल्यानंतर, फळांचा आकार व वजनानुसार त्याची प्रतवारी केली जाते.

  • ‘अ’ दर्जा – २०० ते २५० ग्रॅम
  • ‘ब’ दर्जा – १५० ते १९९ ग्रॅम.
  • ‘क’ दर्जा- १५० ग्रॅम पेक्षा कमी

उत्पादन

रंगीत ढोबळी मिरची पिकाचे योग्य व्यवस्थापन केलेल्या हरितगृहातील प्रत्येक झाडापासून ५ ते ७ किलो उत्पादन मिळते. म्हणजेच दर चौ. मी. १३ किलो ते १८ किलो उत्पादन मिळते. तसेच शेडनेट हाऊसमधून रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) फळांचे उत्पादन प्रती झाड सरासरी ३ किलो ते ४ किलो पर्यंत मिळते.

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) पिकातील प्रमुख रोग व कीड

रंगीत ढोबळी मिरची पिकातील महत्त्वाचे रोग व कीड या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) पिकातील प्रमुख रोग

मर (Damping-Off)

हा एक बुरशीजन्य रोग असून याचा पिकांच्या कोवळ्या रोपांवर परिणाम होतो. याचे लक्षण पिकाच्या खोडावर काळसर डाग दिसतो व काही दिवसातच खोड कुजते व झाडाची मर होते. हा रोग प्रामुख्याने खराब निचऱ्याच्या जमिनीत जास्त प्रमाणात आढळतो.

भुरी (Powdery mildew)

पांढऱ्या रंगाची पावडर पानच्या खालच्या बाजूला दिसून येते. यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि पाने गळतात.

सिर्कॉस्पोरा लीफ स्पॉट (cercospora leaf spot)

रोपाच्या पानाच्या पृष्ठभागावर प्रथम लहान पिवळे डाग दिसून येतात व नंतर यांचे रूपांतर गडद राखाडी रंगात होते व ते संपूर्ण पानावर पसरते, परिणामी पाने गळतात.

फायटोफथोरा (Phytophthora)

हा रोग फुलांच्या व फळधारणेच्या अवस्थेत दिसून येतो, परिणामी रोपाच्या पानाच्या पृष्ठभागावर लहान तेलासारखे डाग पडतात. ज्यामुळे झाडे कुजतात आणि काळी पडतात. नंतर रोप कमकुवत होऊन २-३ दिवसात मरते.

 मुसळधार आणि सततचा पाऊस तसेच उच्च आर्द्रता या रोगाच्या झटपट प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. नेट हाऊसमध्ये फायटोफथोरा रोग तुलनेने अधिक गंभीर असतो, ज्यामुळे ४०-८० टक्के पिकांचे नुकसान होऊ शकते.

मोझॅक व्हायरस (Cucumber Mosaic Virus (CMV))

हा विषाणू रोग फुलकिडे आणि मावा यांच्या मार्फत पसरतो. यामध्ये रोपाच्या पानांच्या मध्यभागी आणि फळांवर देखील पिवळे ठिपके आढळतात व पाने वरच्या आणि खालच्या दिशेने कुरळे होतात. जास्त प्रादुर्भावामुळे पाने गळतात, झाडाची वाढ खुंटते आणि फळांची गुणवत्ता कमी होते. विषाणू ग्रस्त फळे विक्री योग्य नसतात.

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) पिकातील प्रमुख कीड

मावा ( Aphids) :

रंगीत ढोबळी मिरची (colour capsicum) रोपाच्या पानाच्या पाठीमागे हि कीड आढळून येते. याचा आकार साधारणपणे  १ ते २ से. मी. असतो, याचा रंग पारदर्शक पिवळसर असतो. याच्या रंगामध्ये पिकानुसार बदल आढळतो. पूर्ण वाढ झालेला मावा व त्याची पिले झाडाच्या पानाच्या मागच्या बाजूला समूहाने राहतात.

अनुकुल हवामान:

ढगाळ हवामानात माव्यांची संख्या वाढते.

कमी तापमान लहान माव्यासाठी अनुकुल असते.

फुलकिडे (Thrips)

फुलकिडे पिकावर संपूर्ण आयुष्यभर आढळून येतात, परंतु जेव्हा झाडाला फुले येऊ लागतात तेव्हा ते अधिक उपद्रवी ठरतात.

हे फुलकिडे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने वरच्या दिशेने कुरळे होतात व फुले वेळेपूर्वी गळून पडतात.

लाल कोळी (Spidermite)

प्रौढ व लहान कोळी हे पाने, कळ्या आणि फळे खातात. ते रोपाच्या पानातून रस शोषतात ज्यामुळे पाने खाली कुरळी होतात. पानांचा व फळांचा आकार कमी होतो. ज्यामुळे उत्पादनाच्या बाजार मूल्यावर याचा परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव उष्ण तापमानासह उच्च आर्द्रतेत वाढतो.

सूत्रकृमि (Nematodes)

या रोगाची लागण होताच प्रथम पानांला पिवळसरपणा दिसून येतो, त्यानंतर पानांचा आकार, संख्या आणि फळांच्या आकारात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. जेव्हा संक्रमित रोप उपटून पाहिली असता, मोठ्या संख्येने नेमाटोड च्या गाठी मुळांवर दिसून येतात. जर आपण एकाच शेतात ३-४ वेळा सतत एकाच पिकाची लागवड केल्यास याचा प्रभाव जास्त दिसून येतो.

Leave a Comment

Pin It on Pinterest